Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रावण मासाचे औचित्य साधून धोंडे जेवण, गोसेवा व गोपूजन सोहळा

लातूर प्रतिनिधी - येथील द्वारकादास शामकुमार व पाटील परिवाराच्या वतीने श्रावण मासाचे औचित्य साधून शनिवारी दुपारी गौ सेवा व गौ पूजन सोहळा उत्साहात

तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळला
तलवारींचा साठा आणणार्‍या चौघांना अटक | DAINIK LOKMNTHAN
पठाणी धोबीपछाड ! 

लातूर प्रतिनिधी – येथील द्वारकादास शामकुमार व पाटील परिवाराच्या वतीने श्रावण मासाचे औचित्य साधून शनिवारी दुपारी गौ सेवा व गौ पूजन सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात गोमातांची विधिवत पूजा करुन त्यांना मिष्ठान्न भोजन घडविण्यात आले. द्वारकादास शामकुमारचे संचालक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा धार्मिक सोहळा पार पडला. तीन वर्षातून एकदा येणार पुरुषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना नुकताच संपला. या महिन्याच्या अनुषंगाने घरोघरी जावयांना निमंत्रित करुन धोंडे जेवण, धोंडेदान देण्यात आले. आपल्या भारतीय संस्कृतीत नेहमीच पूजनीय मानल्या गेलेल्या गोमातेचा श्रावण मासाच्या निमित्ताने गौरव, पूजन करावे, धोंडे जेवणासह त्यांनाही मिष्ठान्न भोजन घडवावे या उदात्त हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन सिटी हिल्स कॉलनी, गणेश अपार्टमेंट समोर, जुना एमआयडीसी रस्ता लातूर याठिकाणी करण्यात आले होते. या मंगलमय सोहळ्यास साखरा पाटी जवळील निळकंठेश्वर गोशाळेतील एकूण 150 गोमातांसह गोसेवक निळकंठेश्वर महाराज, आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य निलेश राजेमाने, प्रा. डॉ. राम बोरगावकर, रमेश बिरादार, प्रा. विवेकानंद ढगे , प्रा. ओमप्रकाश झुरुळे, आपल्या नृत्याविष्काराने गिनीज बुकात लातूरचे नाव नोंदविणारी सृष्टी जगताप, सृष्टीचे माता-पिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाधव – पाटील परिवाराच्या वतीने दशरथराव जाधव-पाटील, सौ. दैवशाला दशरथराव जाधव – पाटील, राजेंद्र पाटील – सौ. मीना राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील – सौ. दुर्गा तुकाराम पाटील, सदाशिव पाटील – सौ. वैष्णवी सदाशिव पाटील यांनी या गोमातांचे विधिवत पूजन करून त्यांना धोंडे भरवले . यावेळी उपस्थित दांपत्य – महिला भगिनींच्या हस्तेही गोपूजन करण्यात आले. सर्व गोमातांचे पूजन केल्यानंतर त्यांच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली. या मंगलमय सोहळ्यात आरती झाल्यानंर शुभप्रसंगी एका गौमतेने गोंडस अशा वासराला जन्म दिला. मागच्या अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या वरुण राजानेही आपली हजेरी लावून गोपूजनास उपस्थित गोमातांवर आपला वर्षाव केला. बरसत्या पावसात गोपूजनाचा हा सोहळा सर्वांना सुखावून गेला. अशा प्रकारच्या आगळ्या, वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अनेकांनी तुकाराम पाटील व त्यांच्या परिवाराचे कौतुक केले. याप्रसंगी शशीकिरण भिकाने, कैलास मंत्री, प्रमोद भोयरेकर, संतोष बिराजदार, अ‍ॅड. दासराव शिरुरे, मोटेगावकर अण्णा, अमोल चामे, शंकर चामे, तुकाराम शिंदे, सदाशिव इर्ले, अनिरुध्द हंगरगे, डॉ. सुदाम पवार, माजी नगरसेविका रागिणी यादव, वनिता काळे, ओंकार पाटील, डॉ. गणेश पाटील, अर्जुन पाटील, सोहमराजे पाटील, अंजली पाटील, अदिती पाटील यासह सिटी हिल्स कॉलनीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS