Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तगरखेडा येथील शेतकर्‍याची आत्महत्या

निलंगा प्रतिनिधी - तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी सतीश अण्णाराव थेटे (44) हा. मु. औराद शहाजानी यांनी सततची नापिकी, कर्ज, घरसंसार कसा भागवावा व

नरेश राऊत फाउंडेशनकडून पाडाळणे शाळेस अ‍ॅक्टिह बोर्ड भेट
खोटे कथानक पसरवणार्‍यांना सडेतोड उत्तर द्या ः मुख्यमंत्री शिंदे
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

निलंगा प्रतिनिधी – तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी सतीश अण्णाराव थेटे (44) हा. मु. औराद शहाजानी यांनी सततची नापिकी, कर्ज, घरसंसार कसा भागवावा व आजारपणात उपचारांसाठी पैशांचा अभाव या कारणांमुळे राहत्या घरी गळ्यावर स्वत:च वार करून घेऊन आत्महत्या केली.
लातूर येथे शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर औराद शहाजनी येथे सायंकाळी अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई, असा परिवार आहे. थेटे यांच्या आई लक्ष्मीबाई म्हणाल्या की, गेल्या एक महिन्यापासून पाऊस नाही. शेती पिकेनाशी झाली आहे. हाताला काम नाही. यातच आजारपण व या वर्षी पिकले नाही तर जगावे कसे? कर्ज फेडावे कसे? या चितेंत तो काही दिवसांपासून बोलत होता. सोमवारी सकाळी 7.30 वाजता आम्ही घरातील अंगणात काम करीत असताना त्याने दार आतून बंद करून घरातील जनावरांना वैरण कट करायच्या कोयत्याने गळ्यावर वार करून घेतले. आवाज ऐकताच त्याला रुग्णालयात दाखल केले.

COMMENTS