Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयत्याचा धाक दाखवून वेटरला लुटले

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क परिसरातील तनिष्का ज्वेलर्स येथील हॉटेल हिडन पॅलेसमध्ये वेटर म्हणून काम करत अस

गाय खरेदीसाठी दूध उत्पादकांचे पंजाब-हरियाणाला प्राधान्य
नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालयाकडून सत्कार

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क परिसरातील तनिष्का ज्वेलर्स येथील हॉटेल हिडन पॅलेसमध्ये वेटर म्हणून काम करत असलेला एक तरुण काम संपवून राहत्या घरी जात होता. त्यावेळी मोटरसायकल वरून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.
ओमकार संजय कसाळकर (वय-20 वर्षे, राहणार-विश्रांतवाडी, पुणे )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या 17 वर्षाच्या दोन साथीदारांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत गणाराम मिळणारा देवासी (वय-31, मूळ राहणार – राजस्थान , सध्या राहणार -ताडीवाला रोड ,पुणे ) याने आरोपी विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हॉटेल हिडन पॅलेसमध्ये वेटर म्हणून काम करत असलेले तक्रारदार गंगाराम देवासी हे त्यांचे काम संपवून राहत्या घरी ताडीवाला रोड येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून तीन अनोळखी तरुण मोटरसायकल वरून येऊन त्यांच्या जवळील व कोयताचा धाक दाखवला. त्यानंतर तक्रारदार याचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम असा 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन सदर तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक एस लिंगाडे याबाबत पुढील तपास करत आहे.

COMMENTS