Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा समारोप

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याचे माजी आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
सचिन चौगुले हल्ल्यातील आरोपींना अटक करावी
फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याचे माजी आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5 ते 7 वी लहान गट व इयत्ता 8 ते 10 वी मोठा गट असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील दहा विद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक आढाव व पर्यवेक्षिका शेलार व विविध शाळातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान गटामध्ये प्रथम-आदिश अरुण कोळपे (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव-कोळपेवाडी) याने मिळविला. वैष्णवी उमेश हासे (आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण) हिने द्वितीय क्रमांक तर शर्वरी रावसाहेब आग्रे (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकमठाण) हिने तृतीय क्रमांक मिळविला.तसेच मोठ्या गटामध्ये रुचिता रोहिदास पवार (आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकमठाण) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला. ईश्‍वरी संदीप बोरनार (गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर) हिने द्वितीय क्रमांक तर पल्लवी निलेश गुंजाळ (न्यू इंग्लिश स्कूल काकडी) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख नसिर पठाण यांनी केले.तर शहाजी ढोणे यांनी आभार मानले. तसेच युरो किड्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने गौतम पब्लिक स्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी युरो किड्सच्या मुख्याध्यापिका  विमल राठी उपस्थित होत्या.

COMMENTS