Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुडाळ परिसरात खरिपाच्या पिकाला पावसाची आवश्यकता : पावसाअभावी शेतकरी चिंतेत

कुडाळ / वार्ताहर : मान्सूनने यावर्षी उशिरानेच आगमन केले. यातही म्हणावा तसा पाऊसही झाला नाही. यामुळे जुलै महिण्यात खरिपाची पेरणी झाली. यानंतर पावस

महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 60 एकर ऊस जळून खाक
कळंबी येथे विजेच्या तारा येतायत हाताला; शेतकर्‍यांचे जीव मुठीत घेऊन कामकाज; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

कुडाळ / वार्ताहर : मान्सूनने यावर्षी उशिरानेच आगमन केले. यातही म्हणावा तसा पाऊसही झाला नाही. यामुळे जुलै महिण्यात खरिपाची पेरणी झाली. यानंतर पावसाची रिमझिम होती. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली असून याचा खरिपाच्या पिकांवर परिणाम होणार आहे. कुडाळ परिसरात शिवारात सद्यस्थितीत पिके डोलत असून त्यांच्या वाढीसाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. पावसाने पाठ फिरवल्याने चांगली आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता अधिकच वाढली आहे.
कुडाळ आणि परिसरात या हंगामात प्रामुख्याने सोयाबीनचे, भुईमूग ही पीके घेतली जातात. सद्यस्थितीत ही पिके फुलात आली असून पावसाने दडी मारल्याने सुकू लागली आहेत. सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. मात्र, पावसावर अवलंबून असणार्‍यांची मोठी अडचण झाली आहे. या प्रमाणात शेंगाही लागणार नाहीत. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची आहे. याकरिता पिके फुलण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे.
गेली आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी शेतातील तण काढणे, कोपळणी करणे ही कामे उरकून घेतली आहेत. यावर्षी पाऊस उशिरा दाखल झाला होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने खरिपाची पेरणी झाली. पेरणीनंतर रिमझिम पाऊस होता. यामुळे पिकेही चांगली आली. शिवारात घेवडा, वाटणा, सोयाबीन, भुईमूग या पिकांना फुले येऊ लागली असून याला पावसाची नितांत गरज आहे.

COMMENTS