कर्जत /प्रतिनिधी ः जेष्ठ विचारवंत, माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात महिला
कर्जत /प्रतिनिधी ः जेष्ठ विचारवंत, माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात महिला तसेच विद्यार्थिनींना ’कर्जत लाईव्ह’च्या वतीने सन्मानित करण्यात आले. डॉ. सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त ’कर्जत लाईव्ह’च्या वतीने रांगोळी तसेच लेख लेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पर्यावरण तज्ञ डॉ.प्रवीण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रमा सप्तर्षी, प्राचार्य डॉ.दिलीपसिंग निकुंभ, प्राचार्य गोरक्ष भापकर, पर्यवेक्षक बाळासाहेब काळे, विकास कुलकर्णी, अण्णासाहेब मोरे, प्रा.सुनिता सटाले, मारुती सायकर, सुरेश पवार, काशिनाथ सोनवणे, पोपट खोसे, ’युक्रांद’चे अप्पा अनारसे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून गोरक्ष भापकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी,अप्पा अनारसे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. किरण जगताप यांनी केले. मारुती सायकर यांनी आभार मानले.
विद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक विकास कुलकर्णी यांच्या वतीने उपस्थितांसाठी स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगदान दिले.कर्जत येथील पोपटभाऊ कुलथे सराफ सुवर्णपेढीचे संचालक अनुज कुलथे यांच्या वतीने लेखन स्पर्धेतील विजेत्यांना चांदीचा गणपती भेट देण्यात आला. मिरजगाव येथील पत्रकार विनायक चव्हाण यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना शैक्षणिक साहित्याचे किट भेट देण्यात आले. चौकट : रांगोळी स्पर्धेतील विजेते-
रांगोळी स्पर्धेतील विजेते – प्रथम : आरती काळे, वर्षा काळे. द्वितीय : वैष्णवी सोनवणे सोनाली तावरे. तृतीय : जान्हवी घोगरे, गौरी जंजीरे. रांगोळी व लेख लेखन स्पर्धेतील विजेत्यांना प्रा. किरण जगताप यांच्या वतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
COMMENTS