Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठी पेपरला सर्व्हर डाऊनचा फटका

पेपरच्या वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटके कॉपी करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर

पेटा संघटना बैलगाडा शर्यतीविरोधात घटनापीठाकडे मागणार दाद
राजकीय मुखवटे
बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटके कॉपी करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतरही हा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी सकाळच्या सत्रात सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच सोमवारी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणार्‍या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परीक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
अनेक विद्यार्थी संघटनांनी तलाठी पदासह अनेक पदाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर सोपवावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच तलाठी भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रूपये तर इतर प्रवर्गातील उमेदवारांकडून 900 रुपये फी आकारण्यात आली आहे. तरी देखील या परीक्षेतील घोळ तसाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा सोमवारी (21 ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, लातूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. प्रशासकी पातळीवरुन करण्यात आलेल्या नियोजनावर विद्यार्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल या विद्यार्थांनी उपस्थित केला आहे. या सर्वांमुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परीक्षेत सर्व्हर डाऊन झाला आहे. तर केवळ नागपुरातच नाही तर राज्यभरातील अकोला, अमरावती, लातूरमध्येही काहीशी अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार उदासीन ः वडेट्टीवार – तलाठी भरतीच्या नावखाली राज्यात बेरोजगार तरुणांची शासन फसवणूक करत असल्याचा आरोप सोमवारी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भरतीच्या नावाखालील हजार-हजार रुपये जमा केले जात आहेत. हे पैसे कोणाच्या खात्यात जातात? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. सर्व्हर डाऊन झाल्यावर वडेट्टीवर यांनी देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा सावळ्या गोंधळामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल, असेही ते म्हणाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

COMMENTS