Homeताज्या बातम्याविदेश

इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या

इंग्लंड प्रतिनिधी - इंग्लंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात निष्पाप बाळांची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी एका नर्सला शिक्षा सुनावण्यात आ

आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरु करावी शिवसेनेचे रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांना निवेदन
गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे

इंग्लंड प्रतिनिधी – इंग्लंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात निष्पाप बाळांची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी एका नर्सला शिक्षा सुनावण्यात आली. तिने आणखी सहा बाळांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असंही समोर आलं आहे. लुसी लेटबी असं या नर्सचं नाव आहे. 33 वर्षीय लुसीने अत्यंत निर्दयीपणे बाळांची हत्या केली होती. तिच्या घरी तपास केला असता पोलिसांना विविध प्रकारच्या नोट्स लिहिलेल्या आढळल्या. यातील बहुतांश नोट्समध्ये ‘मी सैतान आहे.’ असं लिहिलेलं दिसून आलं. क्रूरतेचा गाठला कळस या नर्सने काही बाळांना हवेचं, इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन मारलं. तर, काहींना अधिक प्रमाणात दूध पाजून आणि काहींना मारहाण करून त्यांची हत्या केली. तिने अशा प्रकारे सात बाळांचा जीव घेतला, आणि इतर सहा बाळांची हत्या करण्याचा प्रयत्न केला; मँचेस्टरच्या क्राउन कोर्टात सांगण्यात आलं. ‘मला जगायचा अधिकार नाही’लुसीच्या घरी आढळलेल्या नोट्समध्ये तिने हत्येची कबूली दिल्याचंही दिसून येत आहे. “मला त्यांची काळजी घेता येत नाही, म्हणून मी त्यांना ठार केलं. मला जगायचा अधिकार नाही. मी खरोखरच एक सैतान आहे.” असं तिने एका नोटमध्ये लिहिलं आहे. कधीचं आहे प्रकरण? हे प्रकरण 2015-16 सालचं आहे. या एका वर्षामध्ये लुसीने 13 बाळांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. ती काउंटीज ऑफ चेस्टर रुग्णालयात काम करत होती. बाळांची हत्या करून, हे मृत्यू नैसर्गिकरित्या होत असल्याचं तिला दाखवायचं होतं, असं वकीलांनी सांगितलं. या प्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं. आता 21 ऑगस्ट रोजी तिला शिक्षा सुनावण्यात येईल.

COMMENTS