Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उदगीर येथे रास्ता रोको

उदगीर प्रतिनिधी - पाचोर येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घट

रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीकडून महिलादिन उत्साहात
बसपचा आक्रोश मोर्चा आज  नागपूरच्या विधानभवनावर धडकणार  

उदगीर प्रतिनिधी – पाचोर येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेतील मारहाण करणा-या आमदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पाचोरा (जि.जळगाव) येथील पाचोरा येथील पत्रकार महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी विरोधात बातमी का लिहिली म्हणून प्रथम उर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यानंतर आपल्या गुंडाकडून चौकात गाडी आडवून, गाडी आडवी पाडून अमानुषपणे मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची त्वरित दखल घेऊन शासनाने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची कार्यवाही करावी या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला.यावेळी या मागणीचे लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी विनायक चाकुरे, रोशन मुल्ला, अर्जुन जाधव, युवराज धोतरे राम मोतीपवळे, सचिन शिवशेट्टे, रवींद्र हसरगुंडे, दयानंद बिरादार, डॉ धनाजी कुमठेकर, संतोष जोशी, राजीव किनीकर, श्रीनिवास सोनी, विनोद उगीले, सिद्धार्थ सूर्यवंशी, बिभीशन मद्येवाड, महादेव आनवले, बबन कांबळे, सुनील हावा, बस्वेश्वर डावळे, अशोक कांबळे, बालाजी कवठेकर, राजकुमार नावंदर, अ‍ॅड गोविंद सोनी, महेश मठपती, भगवान सगर, मंगेश सूर्यवंशी, मनोहर लोहारे, अविनाश सूर्यवंशी, संदीप निडवदे, जावेद शेख, संगम पटवारी, जीवन भोसले, दत्तात्रय भोसले, गंगाधर भेंडेगावकर, नितीन एकुर्केकर, श्रीकृष्ण चव्हाण, राम जाधव, विश्वनाथ गायकवाड, संग्राम पवार, अ‍ॅड. डॉ. श्रवणकुमार माने, अनिल जाधव, माधव घोणे, अशोक तोंडारे, लक्ष्मण रणदिवे, जय मादळे, अझरुद्दीन शेख, संदीप पाटील, सुधाकर नाईक, बसवराज बिरादार, गणेश मुंडे, ईश्वर सूर्यवंशी, सुरेश पाटील नेत्रगांवकर पत्रकार उपस्थीत होते.

COMMENTS