Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतक-यांच्या पिकांनी माना टाकल्या असून पिके वाळत आहेत तरी शासनाने जिल्ह

मनामनात श्रीराम भक्तीची ज्योत पेटवा – प्रदीप महाराज नलावडे
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा फासले काळे !
तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतक-यांच्या पिकांनी माना टाकल्या असून पिके वाळत आहेत तरी शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतक-यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने केलेल्या आंदोलनादरम्यान केली.
पुढे बोलताना त्यांनी या आठवड्यात जर शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही व संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा दिला आहे. या तीव्र निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने जमलेल्या मनसैनिकांनी बराच काळ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली. ज्यात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणा-या नुकसानीसाठी शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी. जिल्ह्यातील पिके वाळत असल्याने पीकविमा कंपनीने जिल्हाभरातील शेतक-यांना पिकविम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम शेतक-यांना तात्काळ द्यावी, 992 व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतक-या विकणा-या बिजोत्पादन कंपन्यावर कडक कार्यवाही करावी तसेच खत बीयाण्याची लिंकीग, चढयादराने खत बियाण्याची व किटकनाशकाची विक्री करणा-या विक्री दुकानदारांवर कार्यवाही करावी आदी मागण्यांंचा निवेदनात समावेश आहे. या आंदोलनात संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिादे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी सचिन सिरसाट, प्रीती भगत,किरण चव्हाण, अंकुश शिंदे, वाहिद शेख सचिन बिराजदार, संग्राम रोडगे, महेश बनसोडे, सोमनाथ कलशेट्टी महेश देशमुख, श्रीनिवास शिंदे, महेश माने,अनिल जाधव, रामदास पाटील, संतोष भोपळे, सुनील तोडचीरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर,अजिंक्य मोरे, ऋषीकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे,पवन राजे, दत्ता म्हात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे,चेतन चौहान,संभाजी सिरसाट, प्रमोद आंबेकर, विशाल कातळे, लक्ष्मण लांडगे महेश नागरगोजे, शिवराज सिरसाट, अंगद खलग्रे,आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS