Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केसरी वाड्यात गणपतीचे महिन्याभरापूर्वीच आगमन

पुणे/प्रतिनिधी ः यंदा गणरायाचे आगमन लांबणीवर पडले असून, 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी पुण्यात विविध गणेशमंडळाकडून आकर्षक देख

नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा
नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैसा अभावी थांबू नये- शेखर मुंदडा
पुण्यातच कोव्हिशिल्ड संपले; शहरातली सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ

पुणे/प्रतिनिधी ः यंदा गणरायाचे आगमन लांबणीवर पडले असून, 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी पुण्यात विविध गणेशमंडळाकडून आकर्षक देखाव्याचे कामकाज सुरू आहे. मात्र जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतांना, पुण्यात केसरी वाड्यामध्ये रविवारी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे.
काही दिवसांपासून गणेश मंडळ आणि प्रत्येकाच्या घरात गणरायाच्या आगमनानिमित्त यंदाच्या वर्षी कोणता देखावा करायचा, कशा प्रकारे गणरायाचे स्वागत करायचे याची चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान रविवारी पुणे शहरातील मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे जोरदार पावसात आणि ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. आपल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर नागरिकांनी गर्दी केली होती. तर मिरवणुकीचे दृश्य आपल्या कॅमेर्‍यात कैद करताना अनेक पुणेकर नागरिक पाहण्यास मिळाले. ही मिरवणूक पालखीमधून रमणबाग शाळा, ओंकारेश्‍वर मंदिर, नारायण पेठ पोलीस चौकी आणि केसरी वाडा या मार्गाने काढण्यात आली. मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे अध्यक्ष दीपक टिळक, विश्‍वस्त रोहित टिळक यांच्यासह मंडळाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहित टिळक म्हणाले की, गणरायाच्या आगमनाची आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. त्या गणपती बाप्पाचे 19 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. पण मानाचा पाचवा केसरी वाडा येथील बाप्पाचे आगमन टिळक पंचांगानुसार दरवर्षी होत असते. त्यानुसार गणपतीचे आगमन होते. त्या पार्श्‍वभूमीवर केसरीवाडा येथे पुढील महिनाभर विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS