पुणे/प्रतिनिधी ः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होवून दहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, त्यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार मोकाट असल्याची ख
पुणे/प्रतिनिधी ः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होवून दहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, त्यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार मोकाट असल्याची खंत अंधश्रद्धा निमूर्लन समितीने व्यक्त केली. दाभोळकरांच्या हत्येला रविवारी 10 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त दाभोळकरांची पुण्यातजिथे हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन अनिसंकडून निर्धार रॅली काढण्यात आली.
दाभोळकरांच्या हत्येच्या दहा वर्षांमध्ये सीबीआयच्या चुकीच्या तपासामुळे पहिली पाच वर्ष दाभोळकरांच्या हत्येचा खटला सुरूच होऊ शकला नाही. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासामुळे दाभोळकरांवर गोळ्या झाडणार्या दोघांना अटक करण्यात आली. मात्र अजूनही दाभोळकरांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. दाभोळकरांच्या हत्येचा कोणताही परिणाम न होऊ देता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम मागील दहा वर्षात आणखी जोमाने वाढले आहे. दाभोळकरांची पुण्यात जिथे हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन अंनिसकडून निर्धार रॅली काढण्यात आली. सूत्रधारांपर्यंत आपण पोहचू शकलो नाही, अशी खंत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आमच्या मनात दु:खाची सल आहे. पण दाभोळकरांच्या हत्येचा सूत्रधार अजूनही सापडला नाही ही देखील सल आमच्या मनात असल्याचे अंनिसने यावेळी म्हटले आहे. तर दाभोळकरांची हत्या ही पुरोगामी विचारांवर ओरखडा नसून पुरोगामी विचारांवर पडलेला हा एक डाग आहे. म्हणून दाभोळकरांच्या स्मृतीला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी हा निर्धार मोर्चा काढण्यात आल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती. शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे अशी मारेकर्यांची नावे असल्याचे पुढे तापासातून समोर आले. या दोघांनी पाठीमागून दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणार्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली. त्यामुळे याच पुलावरुन अंनिसकडून निर्धार रॅली काढण्याचा अंनिसने घेतला. दाभोळकरांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता. त्यामुळे समाजातून त्यांच्यावर अनेकदा टीका टीपण्णी देखील केली जात होती. त्यामुळेच दाभोळकरांची हत्या झाली असल्याचे म्हटले जाते. अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा तपास होण्यासाठी सुरुवातीलाच चुकीच्या दिशेने झाला. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीचा तपास झाल्याचे समोर आले. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होता की, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.
हत्या करणारा एकच गट, पण तरीही तपास अपूर्णच – काँब्रेड पानसरे, एम. एन. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटी करुन करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आले की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडले. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही. अजूनही हा तपास पूर्ण होवू शकलेला नाही.
COMMENTS