Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसार शेख तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

राहुरी खुर्द ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न : विविध मुद्यांवर चर्चा

राहुरी/प्रतिनिधीः राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने 15 ऑगस्टची होणारी ग्रामसभा 18 ऑगस्ट रोजी राहुरी खुर्द येथील बुवासाहेब मंदिर येथे संपन्न झाल

देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे
दूधगंगा सहकारी पतसंस्थेत 80 कोटींचा आर्थिक घोटाळा
प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार

राहुरी/प्रतिनिधीः राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने 15 ऑगस्टची होणारी ग्रामसभा 18 ऑगस्ट रोजी राहुरी खुर्द येथील बुवासाहेब मंदिर येथे संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेत राहुरी खुर्द व गोटुंबे आखाडा या दोन गावाची मिळून ग्रामपंचायतची तंटामुक्ती पुनर्गठित करून यामध्ये नवीन अध्यक्षांची व सदस्यांची ग्रामसभेद्वारे शासननिर्णया प्रमाणे तंटामुक्ती समिती तयार करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राहुरी खुर्दचे मा.उपसरपंच निसार शेख यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे.

या ग्रामसभेमध्ये राम तोडमल, शिवाजी शेंडे, अय्युब भाई पठाण यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. मागील ग्रामसभेचे इतिवृत्तांत वाचून दाखविण्यात आले. इतर उपस्थित ग्रामस्थांनी आपापले विषय मांडले असून त्या प्रश्‍नांची ग्रामपंचायतने योग्य दखल घेऊन त्यावर उपाययोजना राबविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी मालती साखरे या होत्या. तर यावेळी उपसरपंच तुकाराम बाचकर,अश्‍विनी कुमावत, मंगला शेडगे, शिला नजन, तलाठी तुषार काळे, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण,गेणूभाऊ तोडमल, मा सरपंच ईमाम शेख, मधुकर साळवे, आयुबभाई पठाण, राम तोडमल, नंदकुमार डोळस, भिमा गुंड, अशोक मंडलिक, रमेश खेमनर, दिलीप क्षिरसागर, असफ पठाण, ज्ञानदेव तोडमल, उध्दव पवार, मच्छिंद्र पाटोळे, भाऊ जाधव, अमोल आळपे, शिवाजी पवार, रवि चौधरी, विजय पालवे, दुर्गेश वाघ, विजय वेताळ, सोमनाथ गुंड, मनोज घोकसे, राहुल ससाणे, राजेंद्र खोजे, रफिकभाई शेख, बाबा आढगळे, शिवाजी शेंडे, विजय आळपे, ह.भ.प. आदिनाथ दवणे, बाबासाहेब पोपळघट, दादा शेटे, रोहिदास धोत्रे, जगन्नाथ धोत्रे, ईनूस शेख, एकनाथ माळी, संजय बर्डे सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS