Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप

कोपरगाव/प्रतिनिधी : येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दिनांक 12 ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत ’अँटी रॅगिंग जागृती सप्ताह’ विविध

ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात
BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
आ. चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचा शुभारंभ | ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24

कोपरगाव/प्रतिनिधी : येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दिनांक 12 ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत ’अँटी रॅगिंग जागृती सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा प्रारंभ डॉ. वैशाली सुपेकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने करण्यात आला.सप्ताहात त्यानंतर माहितीपट दर्शन, पोस्टर प्रेसेंटेशन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, जागृतीपर कार्यशाळा इ. उपक्रम घेण्यात आले.

डॉ. वैशाली सुपेकर यांनी आपल्या व्याख्यानातून अँटी रॅगिंगची संकल्पना, स्वरुप त्यासंबंधीचे कायदे, शिक्षेची तरतूद अशा विविध बाबीची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या रांगोळी,पोस्टर प्रेसेंटेशन, निबंध या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या विचार -कल्पनांचा आविष्कार घडविला. या सप्ताहाचा समारोप ’अँटी रॅगिंग जागृतीपर कार्यशाळेने’ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कोपरगाव शहराचे पी.आय.वासुदेव देसले यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम, होणारी शिक्षा, विद्यार्थी करिअर याबद्दल सविस्तर सांगून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश सानप यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या अनुभवातील उदाहरणे सांगून रॅगिंग ही छोट्या चुकीतून घडणारी भयंकर शिक्षा देणारी कृती कशी आहे, हे पटवून दिले. तसेच या विकृतीला आपल्या मनात धारा न देता विद्यार्थ्यांनी सहकाराची व समन्वयाची भूमिका बजावावी. असे आवाहन केले.

सदर सप्ताहाचे आयोजन ’अँटी रॅगिंग जागृती समिती’ प्रमुख डॉ.माधव यशवंत यांनी केले होते.या अंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांसाठी प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे,डॉ. सीमा चव्हाण,योगेश आहेर, डॉ.विशाल पवार, प्रा.डॉ.उज्ज्वला भोर, प्रा.महेश दिघे, प्रा.रावसाहेब दहे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रा.डॉ. मोहन सांगळे, डॉ.सुनील काकडे, प्रा.कलावती देशमुख यांनी विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्य केले.

’अँटी रॅगिंग जागृती’ सप्ताहातील रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अ‍ॅड संदीप वर्पे व सुनिल गंगुले यांच्या शुभहस्ते झाले व त्यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदरील सप्ताहात प्राध्यापकांची सक्रिय उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व हिरीरीने सहभाग यामुळे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याने या सप्ताह काळात महाविद्यालयातील माहोलच बदलून गेला होता.

COMMENTS