Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात गणपतीला जाण्यासाठी मोफत बस सेवा

मुंबई/प्रतिनिधी : कोकणातील प्रत्येक माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे विशेष पर्वणी. या उत्सवासाठी कोकणातील प्रत्येक माणूस गावी जातो. यंदा कोकणात गणपतीसा

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी 46 हजार अर्ज
शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)

मुंबई/प्रतिनिधी : कोकणातील प्रत्येक माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे विशेष पर्वणी. या उत्सवासाठी कोकणातील प्रत्येक माणूस गावी जातो. यंदा कोकणात गणपतीसाठी जाणार्‍यां चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कोल्हापूर मार्गे जाणार्‍यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. वर्षा बंगल्यावर या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे गटाने सांगितले. कोकणातील गणेशउत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. मुंबईत स्थाईक झालेले कोकणवासीयांची गणपती उस्तवासाठी घरी जाण्याची लगबग असते. या साठी सहा महिन्यांपूर्वी बुकिंग केले जाते. प्रमुख्याने रेल्वे आणि बसद्वारे कोकणात जणार्‍यांची संख्या जास्त असते. त्यामुळे आयत्यावेळी जणार्‍यांची गडबड होते. त्यांची ही गैरसोय टाळण्यासतही हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रत्येक विधान सभा मतदार संघातून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

COMMENTS