बंगळुरू ः बंगळूरच्या क्रांतिवीर सांगोली रायण्णा रेल्वे स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास थांबली होती. अचानक आग लागली

बंगळुरू ः बंगळूरच्या क्रांतिवीर सांगोली रायण्णा रेल्वे स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास थांबली होती. अचानक आग लागली आणि प्लॅटफॉर्मवर धूर पसरला. दोन डब्यांना आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
COMMENTS