Homeताज्या बातम्यादेश

अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आज त्यानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. ज

सामंथाला उचलून घेत ‘खिलाडी’ अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री.
क्राईम…थ्रिलर…सस्पेन्स…
17 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आज त्यानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. जी त्याच्या लाखो फॅन्ससाठी मोठी गर्वाची बाब आहे. ज्या गोष्टींवरुन अक्षयला मोठ्या प्रमाणात अपमान सहन करावा लागत होता आता त्यावर त्यानं जशास तसं उत्तर दिलं आहे. अक्षयनं आता इंस्टावरुन खास पोस्ट शेयर करत आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सध्या लाईमलाईट आहे. एकीकडे त्याचा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे आता त्याला भारताचे नागरिकत्वही मिळाले आहे. अक्षयनं इंस्टावर व्हायरल केलेली ती पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. अनेक माध्यमांनी अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. त्याला लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रोलही होत असे. आता तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्यानं चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी अक्षयकडे कॅनडा देशाचे नागरिकत्व होते. अक्षय भलेही दुसऱ्या देशाचा नागरिक असेल पण त्यानं भारत आणि भारतीयांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे. कोरोनाच्या काळात अक्षयनं कोरोनाग्रस्तांसाठी केलेली मदत अनेकांना ठाऊक आहे. याशिवाय त्यानं कित्येकदा देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. आज तक ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षयनं म्हटले होते की, भारत हा माझ्यासाठी सर्व काही आहे. आणि आतापर्यत मी जे काही कमावले आहे तेच याच देशात राहून. मला या देशातील लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी खूप नशीबवान आहे की मला भारतात राहायला मिळाले. या देशात राहून मला मान सन्मान मिळाला आहे. मी खूप प्रसिद्धी मिळवली पण हे सगळं याच देशात राहून. मात्र जेव्हा लोकं मला माझ्या नागरिकतेवरुन बोलतात तेव्हा खूप वाईट वाटते. काही लोकांच्या मानसिकतेची मला चिड येते. मी कधीही देश आणि देशातील लोकांचा अनादर केलेला नाही. तेव्हा मला असे का बोलले जाते, असा प्रश्न अक्षयनं उपस्थित केला होता.

COMMENTS