बीड प्रतिनिधी - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय बीड व राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रति
बीड प्रतिनिधी – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय बीड व राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह जनजागृती कार्यक्रम पथनाट्यद्वारे राबविण्यात आले बीड जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण पाहता महाराष्ट्रात बीड जिल्हा दुसर्या क्रमांकावर असून 42 टक्के मुलींचे बालविवाह या ठिकाणी होतात असे निदर्शनास आले आहे बालविवाह मुळे मुलीचा शारीरिक मानसिक शैक्षणिक विकास खुंटतो मुलीचे शिक्षण थांबल्यामुळे तिच्या स्वतःचा व कुटुंबाचा विकास होत नाही मुलगी सामान्यतः एक ओझे मानली जाते आणि पारंपारिक रित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे , मुलीला आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर ,पालकांसाठी आपल्या जातीतच आपल्या तोला मोलाचे कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजता असते ,मुलींना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात ,संस्कृती परंपरा यांच्या नावाखाली सुद्धा अनेक बालविवाह केले जातात ,काही ठिकाणी काम करण्यासाठी जोडीदार म्हणून सुद्धा बालविवाह केले जातात बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडीनि कामगारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोयता पूर्ण करण्यासाठी ही बालविवाह केले जातात ,शिक्षणाचा अभाव बालविवाहाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीचा अभाव यामुळे ही बालविवाह होतात लवकरात लवकर लग्न म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग असेही मानण्यात येते,बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलीचे विवाह करून दिला तर हुंडा कमी द्यावा लागतो व लग्नालाही खर्च कमी येतो परंतु हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा देणे घेणे हाही गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही मुलीचा बालविवाह होऊ नये व ती कायम शिक्षणाच्या मूळ प्रवाहात राहावी ती जर शिकली तर तिचा व तिच्या कुटुंबीयांचा विकास होण्यास हातभार लागतो व त्याबरोबरच राष्ट्राचाही विकास होतो अशाप्रकारे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चा पथनाट्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील 40 गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी सुधीर ढाकणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी बीड यांचे मोलाचे सहकार्य लाभले पथनाट्य मध्ये लक्ष्मीकांत दोडके, रवी धुताडमल, गणेश अवंतकर, तत्त्वशील कांबळे,ज्योती गायकवाड , कीर्ती शिंदे , स्नेहल मुळे,महेश जगताप ,मिथुन जोगदंड ,कबीर जाधव अमोल गायकवाड आदी कलाकारांनी पथनाट्यद्वारे जनजागृती केली .
COMMENTS