अंबाजोगाई प्रतिनिधि - मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात 12 ऑगस्ट रोजी अँटी रॅगिंग दिवस साजरा करण्यात आला यानिमित्ताने अँटी रॅगिंग समितीच्या समन्व
अंबाजोगाई प्रतिनिधि – मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात 12 ऑगस्ट रोजी अँटी रॅगिंग दिवस साजरा करण्यात आला यानिमित्ताने अँटी रॅगिंग समितीच्या समन्वयक डॉक्टर अरुंधती पाटील तसेच प्राचार्य प्रकाश जाधव व सदस्य डॉक्टर हनुमंत साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना संदर्भात संवाद साधला .या दिवसाचे ओचित्य साधून विद्यार्थ्यांना संदर्भात कायदेविषयक तसेच इतरही फिल्म दाखवून त्याविषयीची जागृती करण्यात आली.
12 ऑगस्ट हा दिवस अँटी रॅगिंग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे महाविद्यालय स्तरावर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांकडून अपमानस्पद वागणूक देण्याची परंपरा काही वर्षांपूर्वी अनेक व्यवसायिक आणि इतर महाविद्यालयांमध्ये रुजलेली होती परंतु 2001 मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या याकडे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले आणि त्यातूनच अँटी रॅगिंग संदर्भात यूजीसी ने काही गाईडलाईन्स तयार केल्या. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांवर होणारे हिंसा किंवा अपमानास्पद वागणुकीच्या विरोधामध्ये अँटी रॅगिंग समिती ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये गठीत करणे हे बंधनकारक आहे . महाविद्यालय स्तरावर अशा प्रकारची नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांकडून होणारी पिळवणूक छळ थांबवण्यासाठी ही समिती स्थापन केली जाते रॅगिंग हा गुन्हा आहे आणि त्यावर भारतीय दंड विधान मधील कलमा नुसार असे वर्तन शिक्षेस पात्र होऊ शकते. मानवलोक समाजकार्य महाविद्यालयांमध्ये ही समिती 2013 पासून कार्यरत आहे या कार्यक्रमास दोन्ही वर्गातील विद्यार्थी आणि प्राध्यापक हजर होते
COMMENTS