Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे प्रस्थान

गेवराई प्रतिनिधी - साला बादा प्रमाणे याही वर्षी श्रावणमासा निमित्त माऊली ग्रुपच्या वतीने ढाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे  आज दि 13 ऑगस्ट

रक्षाबंधनपूर्वी बहिणीची भावाला अनोखी भेट, यकृत दान करत वाचवला जीव
टेलिव्हिजन विश्वावर शोककळा
सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?

गेवराई प्रतिनिधी – साला बादा प्रमाणे याही वर्षी श्रावणमासा निमित्त माऊली ग्रुपच्या वतीने ढाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे  आज दि 13 ऑगस्ट रोजी सकाळी गेवराई येथून चाकरवाडी कडे प्रस्थान झाले आहे.आज दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी चितेश्र्वर मंदिरातुन  पायी दिंडीस सुरूवात झाली आहे यावेळी शेकडो माऊली भक्तगण बंधु भगीनी दिंडीत सहभागी झाले होते.
दि 12 रोजी ढाकलगाव येथुन आलेल्या पायी दिंडीचे गेवराई येथे नवीन बसस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले आहे तर सदरील दिंडी गेवराईचे ग्रामदैवत चितेश्र्वर मंदिरात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती तर दिली रोजी पहाटे गेवराई येथुन पायी दिंडीचे चाकरवाडीकडे प्रस्थान झाले आहे या दिंडीचे माऊली भक्त अंबादास गिरी, पुजाराम चोरमले, जगदाळे आदीनी परिश्रम घेतले आहे. आज गेवराई येथुन निघालेली दिडी पेडगाव येथे मुक्कामी थांबणार आहे तर दि.14 रोजी कपीलधार येथे मुक्कामी थांबणार आहे तेथून दि. 15 रोजी कपिलधार येथून चाकरवाडीकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती दिंडीचे आयोजक अंबादास गिरी, चोरमले, जगदाळे यांनी दिली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात माऊली भक्तांनी सहभाग घेतला आहे.

COMMENTS