बीड प्रतिनिधी - स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व भारता
बीड प्रतिनिधी – स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व भारतात सुरू झाली होती. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश,विदर्भ, मराठवाडा, खानदेशतसेच महाराष्ट्राबाहेरची असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक,सांस्कृतिक,वैचारिक,राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. त्यामध्ये अण्णाभाऊं साठे यांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले. म्हणूनच आज मुंबई महाराष्ट्र राज्यात आहे. असे मत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.
बीड सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमिचे 18 हजार फुटामध्ये वाळू, खडीपासून महापोर्ट्रेटचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बोलत होते. यावेळी साहित्य सम्राट गौरव महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, अध्यक्ष अमृत सारडा, सचिव सुभाष लोणके, सावता परिषद अध्यक्ष कल्याण आखाडे, अड.अविनाश गंडले, ज्यांच्या संकल्पनेतून अण्णाभाऊ साठे यांचे महापोर्ट्रेट साकारले असे पंकज जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उल्लेखनीय आहे त्यांच्या साहित्यातून शोषितांचे प्रश्न उमटले गेले आहेत. केवळ दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे समजण्या पलीकडचे व्यक्तिमत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रशियात पोवाडा गाणारे ते पहिले व्यक्ती आहेत. फकीरासारखी अजरामर कादंबरी लिहून, ती कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. यावरून त्यांचा दूरगामी विचार लक्षात येतो. त्यामुळे आजच्या प्रत्येक तरुणाने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समजून घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. साहित्य सम्राट गौरव समितीकडून शहरांमध्ये विविध उपक्रम राबविले गेले.खरंतर असे उपक्रम सातत्यपूर्वक होणे देखील काळाची गरज आहे. त्यामुळे सामाजिक बंधुभाव निर्माण होऊन समाज एकोप्याने राहतो. अशा भावना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केल्या. साहित्य सम्राट गौरव महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समितीच्या पदाधिकार्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
COMMENTS