Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप

कराड / प्रतिनिधी : कोण भिडे गुरुजी? त्यांच नाव मनोहर कुलकर्णी आहे. ज्या माणसाला स्वतःचे नाव लावायला लाज वाटते. तो कसा प्रेरणास्त्रोत होवू शकतो? असा स

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
विवाहित प्रेयसीसाठी बुरखा घालणार्‍या प्रियकरास चोर समजून बदडले
कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

कराड / प्रतिनिधी : कोण भिडे गुरुजी? त्यांच नाव मनोहर कुलकर्णी आहे. ज्या माणसाला स्वतःचे नाव लावायला लाज वाटते. तो कसा प्रेरणास्त्रोत होवू शकतो? असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेचे आ. भाई जगताप यांनी केला आहे.
काँग्रेसचे आ. भाई जगताप यांनी भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, श्रीरंग चव्हाण, झाकीर पठाण, अजित पाटील-चिखलीकर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यावर टीका करणार्‍या मनोहर कुलकर्णी याला माथेफिरू शब्दही सौम्य झाला. भाजपानेच मनोहर कुलकर्णी याला गुरूजी बनवले, असल्याचीही टीका आमदार भाई जगताप यांनी केली.

COMMENTS