Homeमहाराष्ट्रसातारा

सातार्‍यात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग; 18 आशा सेविकांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आशा सेविका संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांना धमकी
कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बापाने चक्क मुलीलाच संपवलं
शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा

सातारा / प्रतिनिधी : जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आशा सेविका संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार श्रध्दा पवार यांनी दिली आहे.

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मोर्चा संयोजकांना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची माहिती देत आंदोलन स्थगित करण्याची सूचना केली. पोलिसांनी केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करत या आंदोलनासाठी नुकतीच जिल्हा परिषदेच्या मैदानावर मोठा जमाव जमला होता.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आनंदी माणिक अवघडे, माणिक विष्णू अवघडे (रा. सदरबझार, सातारा), स्वाती जगन्नाथ भिवरकर (रा. अलगुडेवाडी, फलटण), पल्लवी गणपत नलवडे (रा. आळजापूर, फलटण ), जयश्री बाळासाहेब काळभोर (रा. पाल, ता. कराड), सविता राजेंद्र थोरात (रा. ओंड, ता. कराड), सावित्रा भीमराव भोसले (रा. शिवाजीनगर, खंडाळा), लक्ष्मी अजित दुदुस्कर (रा. दुदुस्करवाडी, ता. जावळी) यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या इतर आशा सेविकांची माहिती पोलीस संकलित करत आहेत. अधिक तपास हवालदार पोळ तपास करत आहेत.

COMMENTS