Homeताज्या बातम्यादेश

संपूर्ण भारत देशच माझे घर

सरकारी बंगला पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे वक्तव्य

नवी दिल्ली/प्रतिनिधी: काँगे्रस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला देखील मिळाला आहे. सर

राहुल गांधींचा ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंतचा प्रवास
राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज
सत्ताधार्‍यांकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी: काँगे्रस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांना पुन्हा एकदा सरकारी बंगला देखील मिळाला आहे. सरकारी बंगला मिळाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण भारत माझे घर आहे, अशा मोजक्या शब्दात राहुल गांधी यांनी सरकारी बंगला मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा प्रशासनाकडून राहुल गांधी यांना मंगळवारी तुघलक लेनवरील बंगला देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांना 22 एप्रिल 2023 रोजी 12 तुघलक लेन येथील बंगला रिकामा करावा लागला होता. त्यानंतर आता न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा तोच सरकारी बंगला पुन्हा मिळाला आहे. सूरत कोर्टाने 24 मार्च रोजी मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचं खासदारकी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागला होता.

COMMENTS