Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 लाखांसाठी अपहरण करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पुणे/प्रतिनिधी ः उबेर चालकाचे 15 लाखांसाठी अपहरण करुन खंडणीची मागणी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी सांगली

अखेर २ वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा लागला शोध | LOK News 24
अपघातात बाईकस्वार सेल्समनचा मृत्यू ,अल्पवयीन कार चालक ताब्यात | LOKNews24
कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट !

पुणे/प्रतिनिधी ः उबेर चालकाचे 15 लाखांसाठी अपहरण करुन खंडणीची मागणी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
वैभव श्रीकृष्ण जाधव (वय-32) असे सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय मोहन कदम (वय 28,रा. नेपाळ, सध्या रा.खानापूर, सांगली), सुशांत मधुकर नलावडे (26 रा. तासगाव, सांगली), महेश मलिक नलावडे (25, रा. तळे वस्ती, तासगाव, सांगली), रंजीत दिनकर भोसले (26, रा. तासगाव, सांगली), प्रदीप किसन चव्हाण (26,रा. खानापूर, सांगली) व अमोल उत्तम मोरे (32, रा. बिरंवडी, ता. तासगाव, सांगली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव जाधव हा सन 2020 मध्ये आरोपी अक्षय कदम या सोनार व्यवसायिकाकडे काम करत होता. त्यावेळी त्याच्याकडून सोने गहाळ झाले होते. त्याबदल्यात त्याच्याकडून 15 लाख रुपयांची मागणी आरोपी करत होते. परंतु पैसे मिळत नसल्याने आरोपींनी पाच ऑगस्ट रोजी वैभव जाधव याच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीयांना पैशाची मागणी करण्यात आली होती. याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिस पथके आरोपीचा शोध घेत होते. या गुन्ह्याचा खंडणी विरोधी पथक एक युनिट दोनचे पथक व उत्तमनगर पोलीस तपास करत होते. त्यावेळी संबंधित आरोपी हे सांगली जिल्हयातील तासगाव येथे गावाबाहेरील एका बंद पत्र्याच्या खोलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

COMMENTS