Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा शल्य चिकित्सक  सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करा

पत्रकारां सह विविध संघटना ,व्यक्तींचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निवेदने.

माजलगाव प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, गोरगरिबांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अहोरात्र काम करणारे

पोलीस दलाचे बळकटीकरण; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ सेवा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध
राज्यात मालमत्ता खरेदी-विक्री जोरात

माजलगाव प्रतिनिधी – बीड जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, गोरगरिबांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अहोरात्र काम करणारे,अनेक रुग्णांना जिवनदान देणारे बीड जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांचे 3ऑगस्ट 2023 रोजी अधिवेशनामध्ये झालेले निलंबन रद्द करण्यात यावे मागणी साठी माजलगावातील सर्व पत्रकारां सह विविध संघटना,व्यक्तिंनी 4आगस्ट शुक्रवार रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार माजलगाव यांना निवेदने दिली.  निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मुळात ज्या भरती प्रक्रिये मध्ये डॉ. सुरेश साबळे यांचा काडी मात्र संबंध नसताना सूडबुद्धीने त्यांना या प्रकरणांमध्ये गोवण्यात आले असून मुळात बाह्यस्त्रोतांमार्फत पद भरती करण्याचा निर्णय सरकारचा कंपनी नियुक्त करणारे देखील सरकारच होते. व पदे देखील कंपनीने भरायची कंपनी ज्याला पाठवील त्यांना अधिकार्‍यांनी रुजू करून घ्यायचे या भरतीच्या माध्यमातून कंपनीचे लोक कोणाकडून काय घेत आहेत याची माहिती आरोग्य अधिकारी यांना कशी असेल. किंवा कंपनीच्या नावावर कोणी कोणी वसुली केली त्याची जबाबदारी कंपनीने घ्यायला पाहिजे. म्हणून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारने माया गोळा करणार्‍या वर कारवाई करावी. जोपर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत सरकारने बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करावे. व चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा आशयाची निवेदने देण्यात आली.
रिपाई (गवई गट.)चे मुख्यमंत्र्याना निवेदन.**
डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणी चे सविस्तर निवेदन
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गट ) नईम आतार, बीड जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस यांच्या सह पृथ्वीराज निर्मळ, धनंजय फपाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना मेल द्वारे पाठवले असून. विभागीय आयुक्त औरंगाबाद, बीड जिल्हाधिकारी कार्यालय, यांना  ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे. तर माजलगाव तहसीलदार यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे.

COMMENTS