Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांचा सेवापूर्ती सोहळा

बीड प्रतिनिधी - तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवाप

ट्रिपल मर्डर ! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं| LOK News 24
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का
मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम खात्यात संगनमताने भ्र्रष्टाचार सुरु l LokNews24

बीड प्रतिनिधी – तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवापूर्ती निमित्त गटविकास अधिकारी अबिरुद्ध सानप आणि शिक्षणाधिकारी (मा) नागनाथ शिंदे यांच्या उपस्थित भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी श्रीराम टेकाळे सौ.संध्या टेकाळे, दांपत्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचा उपस्थितांनी पुष्पहार बुक्के देऊन सत्कार केला. याप्रसंगी विस्तार अधिकारी मधुकर ताडेकर, तुकाराम जाधव, प्रणिता गंगाखेडकर, शोभा तिडके, मुख्याध्यापक अभिजीत तांदळे, खान सर, बाळकृष्ण तांबे, शंकर पाटील,  मणियार सर, डॉ.जगदीश टेकाळे आदींसह मुख्याध्यापक शिक्षक यांची उपस्थित होते.

COMMENTS