लोहा प्रतिनिधी - तालुक्यातील नदी पत्रातून रेती माफिया दिवसरात्र बेसुमार अनधिकृतपणे रेतीचा उपसा करून जिह्यासह परजिल्ह्यात टीप्पर द्वारे वाहतूक कर
लोहा प्रतिनिधी – तालुक्यातील नदी पत्रातून रेती माफिया दिवसरात्र बेसुमार अनधिकृतपणे रेतीचा उपसा करून जिह्यासह परजिल्ह्यात टीप्पर द्वारे वाहतूक करत आहेत. रेती उपसा व वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाकडून पथके नियुक्त केली आहेत. त्यातील एका पथकाने गत पाच महिन्यांपूर्वी सोनखेड नजीक अवैद्य वाहतूक करणारा हायवा टिप्पर विरुद्ध कार्यवाही करून जप्त करत तहसील कार्यालयात जमा केला होता. मात्र सदरील जप्त हायवा टिप्पर चक्क तहसिल कार्यालय आवारातून चोरीला गेले. परंतु महसूल विभागाने चक्क दहा दिवसांनी लोहा पोलिसांत गून्हा नोंदविला.
अनधिकृत रेती उपसा व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या सुचनेनुसार लोहा तहसील कार्यालय अंतर्गत महसूल विभागाने कांहीं पथके स्थापन केली आहेत. त्यातील एक पथक सोनखेड परिसरात कर्तव्यावर असताना दि. 4 एप्रिल रोजी दगडगाव ते सोनखेड रस्त्यावरून अवैद्य रित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर क्र. एम एच 26 बी ई 5200 हे वाहन ताब्यात घेवून तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रीतसर कार्यवाही करून लोहा तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले हायवा टिप्पर हे दि. 20 जुलै रोजी रात्री टिप्पर मालक शिवदास गंगाधर कदम रा. बेटसांगवी यांनी चोरुन नेले असल्याची तक्रार लोहा महसूल मंडळाचे तलाठी मारोती कदम यांनी लोहा पोलिसांत दिल्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेती चोरी प्रकरणी जप्त करून तहसील प्रांगणात जमा करण्यात आलेला टिप्पर चोरी जाणे म्हणजे खुद्द तालुक्याचे प्रमुख अधिकारी असलेले तहसिलदार यांना रेती माफियांनी एक प्रकारे आव्हान दिले असून टिप्पर चोरी झालेच कसे..? आरोपीला चोरी करण्यास कुणी मदत केली असेल का..? किंवा रेती माफिया आणि महसूल विभागाचे आपसात हितसंबंध आहेत का..? गुन्हा नोंदविण्यास विलंब का..? हे सर्व प्रश्न अकलनिय आहेत. सदरील चोरी प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून यातील दोषी विरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
COMMENTS