Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोरुग्ण मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी – राम कटारे

माजलगांव प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसापासून थोर महापुरुषांची बदनामी व वाईट प्रसिद्धी करून समाजा - समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य मानसिक स

मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्राला अग्रस्थानी आणावे
वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू
पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती

माजलगांव प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसापासून थोर महापुरुषांची बदनामी व वाईट प्रसिद्धी करून समाजा – समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडलेले मनोहर भिडे करत आहेत हे समाज घातक असून त्यांना लवकरात लवकर मनोहर भिडे यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी ,वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास डांबून टाकावे अशी मागणी राम कटारे यांनी केली आहे.
मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सह अनेक समाजसुधारक यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते. मनोहर भिडे याच्याकडून नेहमीच महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी एकलव्य संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख राम कटारे यांनी केले आहे.

COMMENTS