Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभार समाजाच्या राज्यस्तरीय वार्षिक सभेत विविध ठराव संमत

नाशिक :- माती कला बोर्डाला चालना द्यावी, वीटभट्टी, मूर्तिकला व्यवसाय,फ्लायअँश मोफत मिळावी यासह विविध विषयांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा ठरा

युतीनंतर…युतीतच मिळाली 25 वर्षांनी संधी
कीर्तनकार इंदोरीकर महाराज रस्ते अपघातात किरकोळ जख़मी
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

नाशिक :- माती कला बोर्डाला चालना द्यावी, वीटभट्टी, मूर्तिकला व्यवसाय,फ्लायअँश मोफत मिळावी यासह विविध विषयांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा ठराव कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नाशिकच्या सभेत संमत करण्यात आले. नाशिकला कुंभार समाज सामाजिक संस्थेची राज्य पदाधिकाऱ्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर होते.तर व्यासपीठावर कार्याध्यक्ष रमाकांत क्षिरसागर, सुरेश कोते,महेश सायकर, महिला अध्यक्षा रसिका खेडेकर,कोअर कमिटी अध्यक्ष अँड.संजय रुईकर, उपाध्यक्ष उमाजी सुर्यवंशी,वसंत घोडनदीकर,कल्याण कुंभार, सरचिटणीस अजय वीरकर,कोषाध्यक्ष अनंत कुंभार,सोमनाथ सोनवणे,विभागीय अध्यक्ष अशोक सोनवणे (सटाणा),डॉ.दिलीप मेनकर, शरद वाडेकर, पुंडलिक सोनवणे,बाळासाहेब जोर्वेकर,जगदीश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारने 50 कोटी रुपये द्यावेत,कुंभार समाजाला मोफत मिळणारी 20 टक्के फ्लायअँश उपलब्ध करुन द्यावी, वीटभट्टी,मूर्तिकला व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात यासह विविध ठराव मंजूर करुन शासन दरबारी पाठपुरावा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला.समाजाची जनगणना पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारला जाणीव करुन दिली जाईल.असा इशारा अध्यक्ष सतीश दरेकर यांनी दिला. यावेळी विविध आघाडी प्रमुखांनी तसेच विभागवार आणि जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडून वर्षभराचा अहवाल सादर केला. प्रास्तविक कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी केले.स्वागत जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी केले.आभार पुंडलिक सोनवणे यांनी मानले. यावेळी राधेश्याम गायकवाड,वसंत गाडेकर, सुभाष कुंभार,अशोक जाधव,अरविंद क्षीरसागर,गोकुळ सोनवणे,प्रा.तुळशीराम मोरे,गंगाधर जोर्वेकर,गुलाबराव सोनवणे, सविता जगदाळे,मनीषा जगदाळे,हिरालाल जगदाळे आदिंसह प्रदेश पदाधिकारी,महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

COMMENTS