लातूर प्रतिनिधी - महाराष्टात श्रावण महिन्यापासून सणला प्रारंभ होत असतो. यंदा श्रावणाआधीच अधिकमास आल्याने व्रतवैकल्य, उपवास करणा-यांना दोन महिने
लातूर प्रतिनिधी – महाराष्टात श्रावण महिन्यापासून सणला प्रारंभ होत असतो. यंदा श्रावणाआधीच अधिकमास आल्याने व्रतवैकल्य, उपवास करणा-यांना दोन महिने श्रावण महिन्याचे उपवास करावे लागत आहेत. त्यामुळे उपवासाच्या फराळासाठी उपवासकर्त्यांकडून साबूदाण्याला पसंती असून, शहरात साबूदाण्याची नेहमीपेक्षा विक्री वाढली आहे. त्याबरोबरच केळी, डाळींब, मोसबी, आणि सफरचंद या फळांनाही चांगली मागणी वाढली आहे.
सध्या भगरीलाही काही प्रमाणात मागणी आहे. तर सफरचंदच्या दरात मोठी वाढ पाहावयास मिळत आहे. आषाढीच्या वारीपासून महाराष्ट्रात एकप्रकारे धार्मिक उत्सवाला सुरवात होते. त्यानंतर श्रावणापाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सण येतात. या काळात उपवासाच्या खाद्यपदार्थांना चांगलीच मागणी वाढत असते. सलग दोन महिने श्रावणाचे उपवास करावे लागणार असल्याने शहरात साबूदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढलेले आहेत. साबूदाण्याप्रमाणेच इतर उपासाच्या साहित्याची मागणी वाढलेली आहे. उपवासासाठी साबूदाण्याप्रमाणेच विविध फळाला सुधा लोक आपली पसंदि देत असतात. तसेच महाराष्ट्रात आषाढी-कार्तिक एकादशी आणि नवरात्रीच्या काळात सर्वाधिक लोक भगरीलासुधा मागणी देत असतात. अधिकमास वा श्रावणात भगरीला फारशी मागणी नसते. सद्या उपवासाच्या व फळांच्या दरात वाढ आलेली दिसून येत आहे. केळीच्या दरात वाढसाधारणत: 30 ते 40 रुपये डझन असतात. मात्र अधिकमास सुरु झाल्यापासून केळीचे दर 60 ते 70 रुपये डझन आहेत. याप्रमाणे, सफरचंद 200 रुपये प्रती किलो, शाबू 90 ते 100 रुपये किलो, भगर 120 रूपये, शेगदाने 150 रुपये किलो, डाळिब 50ते 60 रुपये किलो यांसह खजूर, राजगिरा लाडू यांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फळांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता किरकोळ विकेत्यांनी व्यक्त केली आहे. अधिकमासात साबूदाण्याची होलसेल आणि किरकोळ विक्रीत सुधा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: नेहमीपेक्षा काही प्रमाणत वाढ झालेली दिसून येत आहे. श्रावण मासात आणखी उपासाच्या साहित्याची व फळांची मागणी वाढण्याची शक्यता आहे, असे शहरातील किरकोळ विक्रत्यांनी सागितले आहे.
COMMENTS