Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्षनेता ठरेल त्यादिवशी काँग्रेसमध्ये स्फोट ः दरेकर

मुंबई ः विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरेल त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल, असा दावा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे अनेक आमदा

बीडच्या गेवराई येथील कापूस फॅक्टरीला आग |
आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही
परिवर्तनामध्ये आमच्या महिला आघाडीवर असतील : स्नेहल नायकवडी

मुंबई ः विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरेल त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल, असा दावा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. 24 नाही तर 48 जागा आमची महायुती जिंकेल, असेही प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. जे स्वतःचा विरोधी पक्षनेता ठरवू शकत नाही ते 24 जागा कशा जिंकणार? त्यांच्या पक्षातच एकमत आणि समन्वय नाही. विरोधी पक्षनेता ठरवू शकत नाही ही त्यांची हतबलता आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर केली आहे. ज्या दिवशी विरोधीपक्षनेता ठरेल त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आकडा आताच सांगू शकत नाही. सर्व पक्षातील चांगली लोके राज्याच्या हितासाठी भाजपसोबत आली तर स्वागतच असेल, असेही दरेकर यांनी म्हटले.

COMMENTS