Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अहमदनगर/प्रतिनिधी ः बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणार्‍या महसूल विभागातील अधिकार्‍यांवर आता कारवाई करून, त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल. अशी माहि

अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?
मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी !
वाळू माफियाप्रमाणे लँडमाफियांना महसूलमंत्री लगाम घालणार का ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणार्‍या महसूल विभागातील अधिकार्‍यांवर आता कारवाई करून, त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पत्रकारांशी साधताना बोलताना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 70 टक्के  जागा यापूर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतू काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकार्‍यांना आता निलंबनाच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यांच्या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल. असे ही त्यांनी सांगितले.
       राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. उंबरे येथील घटना पाहता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल पुढे येवून माहिती देण्याचे आवाहन महसूलमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

COMMENTS