नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कॅनडा या देशात झालेल्या जागतिक पोलिस कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पोलिस अधिकार्यांनी सुवर्णपदक पटाकावून महाराष्ट्राची
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कॅनडा या देशात झालेल्या जागतिक पोलिस कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पोलिस अधिकार्यांनी सुवर्णपदक पटाकावून महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली. ’महाराष्ट्र केसरी’ विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, राहुल आवारे, नरसिंग यादव यांनी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताचे नाव उंचावत सुवर्णपदक पटकावले.
पोलिस आणि अग्निशमन दलासाठी या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे हे तीनही मल्ल महाराष्ट्र पोलिस दलात उच्च पदावर कार्यरत असून तिघांनीही या वर्षीच्या अखिल भारतीय पोलिस गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव केला.अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 ज्ञस मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. नरसिंह यादव यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक तर आशियाई कुस्ती स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली आहे. तसेच त्यांनी वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य मिळवले होते. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाच्या महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पहिल्यांदा सलग तीनवेळा मिळविले आहे. राहुल आवारे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, आशियाई कुस्ती स्पर्धेत तीनवेळा कांस्यपदक तसेच वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले आहे. ते सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुन अवॉर्डी काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. विजय चौधरी यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र केसरी किताब सलग तिन वेळा पटकावला आहे. त्याच बरोबर ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेत त्यांनी दोनवेळा कांस्यपदक मिळवले आहे. ते हिंद केसरी पै.रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे येथे सराव करतात.
COMMENTS