मुले कोरोनाच्या पहिल्या लाटेतून वाचली. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, म्हणून त्यांचा धोका कमी आहे, असे मानले जात होते; परंतु दुसर्या लाटेत मुलेही कोरोनाच्या विळख्यात येत असून त्यांची वाढणारी आकडेवारी चिंता वाटायला लावणारी आहे.
मुंबई/प्रतिनिधीः मुले कोरोनाच्या पहिल्या लाटेतून वाचली. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, म्हणून त्यांचा धोका कमी आहे, असे मानले जात होते; परंतु दुसर्या लाटेत मुलेही कोरोनाच्या विळख्यात येत असून त्यांची वाढणारी आकडेवारी चिंता वाटायला लावणारी आहे. एकूण कोरानाबाधितांत दहा वर्षांच्या मुलांचे प्रमाण 4.42 टक्के आहे.
मुले कोरोनामध्ये असुरक्षित असतात. प्रत्येक 20 व्या रुग्णांत दहा वर्षांपेक्षा एक लहान मूल आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, एकूण कोरोना रूग्णांपैकी 4.42 टक्के मुले ही दहा वर्षापेक्षा कमी वयाची आहेत. 11 वर्ष ते 20 वर्षे वयोगटातील कोरोना बाधितांचे प्रमाण 9.79 टक्के आहे. तज्ज्ञांनी लक्ष वेधले, की सुरुवातीला मुलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती; परंतु आता पोटदुखी, अतिसार, घश्यात वेदना, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे आढळली. एकीकडे कोरोनाच्या विळख्यात मुले येत असताना अजूनही त्यांच्यासाठी लस कधी येईल, याबाबत निश्चित सांगता येत नाही. मुलांची लस कधी येईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या फिझर आणि बायोटेकने 16 वर्षे किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांना लस आणली आहे. भारतात ती कधी येईल, याची अजून नेमकी माहिती नाही; परंतु 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणतीही लस मंजूर झालेली नाही. विस्कॉन्सिन स्कूल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ विद्यापीठात लसीबाबतचे काम पाहणारे डॉ. जेम्स कॉनवे म्हणाले, की या उन्हाळ्यात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस येणे अपेक्षित आहे. 2021 च्या अखेरीस 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठीची लस येऊ शकेल. सहा महिने ते चार वर्षाच्या मुलांसाठी ही लस 2022 च्या सुरुवातीला येणे अपेक्षित आहे. जर हे लोक मुखपट्टीविना आपल्या मुलांच्या जवळ आले तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
काळजी घेऊन मुलांना मैदानात खेळू द्या
नॉर्थवेस्टर्न मेडिसिनच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. निया हर्ड-गॅरिस म्हणतात, की या संसर्गामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मुलांमध्ये एकटेपणा, नैराश्य, चिंता यासारखे बरेच प्रश्न आहेत. म्हणूनच, पालकांनी हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे, की मुलांना एकटे वाटणार नाही. डॉ. जोन्स म्हणतात, की लोक सावधगिरीने मित्र आणि नातेवाइकांसह घराबाहेर खेळाची तारीख वेळ ठरवू शकतात. घराच्या बाहेर सामाजिक अंतरांची काळजी घेऊन मुखपट्टी आणि सॅनिटायझरसह गेट-टू-गेदर ठेवू शकतो. त्यासाठी काळजी घ्यायला हवी.
COMMENTS