Homeताज्या बातम्यादेश

अ‍ॅड. फरेरा आणि गोन्साल्विस यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना जामीन मंजूर करण्यात

अखेर दत्ता दळवींना जामीन मंजूर
अखेर खडसेंच्या जावई गिरीश चौधरीला जामीन मंजूर
जामीन मंजूर झाल्यावरही नेपाळमधील तरुण राहिला कारागृहात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे दोघे 2018 पासून म्हणजे जवळपास 5 वर्षांपासून तुरुंगात खितपत पडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती सुधांशू धूलिया यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने व्हर्नन गोन्साल्विस व अरुण फरेरा यांना जामीन मंजूर केला.
या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल आरोप आहेत. आरोपी मागील 5 वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहेत. भलेही त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. पण तुरुंगात एवढा मोठा काळ काढल्यामुळे ते जामीनाचे हकदार आहेत, असे न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केले. भीमा कोरेगाव दंगलीतील कथित सहभागाप्रकरणी गोन्साल्विस व फरेरा यांची 2018 मध्ये तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण त्यांना तिथे कोणताही दिलासा मिळाला नव्हता. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. हायकोर्टाने आमचा जामीन अर्ज फेटाळून लावला. पण याच प्रकरणातील सहआरोपी सुधा भारद्वाज यांना मात्र जामीन दिला, असा युक्तिवाद त्यांनी आपल्या याचिकेत केला होता.

महाराष्ट्र सोडून न जाण्याचे निर्देश – या दोघांना देण्यात आलेला जामीन हा अनेक अटींसह मंजूर करण्यात आला आहे. या दोघांना ट्रायल कोर्टाची परवानगी घेतल्या शिवाय महाराष्ट्र सोडून जाऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे पासपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपास अधिकार्‍यांकडे जमा करावे लागतील. तसेच हे दोघे ते कुठे राहतात यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावरही निर्बंध आहेत.

COMMENTS