नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोळसा खाण वाटप प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोळसा खाण वाटप प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने विजय दर्डासह तिघांना जामीन मंजूर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी (13 जुलै) कोळसा घोटाळाप्रकरणी मोठा निर्णय दिला होता. दिल्ली न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील प्रकरणात माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवत विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. या प्रकरणात आता दिल्ली उच्च न्यायालयाने विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला अंतरिम जामीन दिला आहे. त्यामुळे त्यांना जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी किमान दोन महिन्यांचा दिलासा मिळाला आहे. दर्डा कुटुंबाला सीबीआयच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या घोटाळा प्रकरणात याआधीही अनेक जण अटकेत आहेत. ज्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.
COMMENTS