नगर शहर भाजपने केला चक्क ; मनसे पदाधिकार्‍याचा सत्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहर भाजपने केला चक्क ; मनसे पदाधिकार्‍याचा सत्कार

नगरच्या राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही व एखादा राजकीय पक्ष दुसर्‍या राजकीय पक्षाचे कौतुक करेल, याचीही सुतराम शक्यता नाही.

रेणुकामाता मल्टीस्टेट ची सर्व बँकांच्या ग्राहकांसाठी ए.टी.एम सुविधा सुरू
मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी
राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत गौतम बँक सेवा देणार ः आमदार काळे

अहमदनगर/प्रतिनिधी-नगरच्या राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही व एखादा राजकीय पक्ष दुसर्‍या राजकीय पक्षाचे कौतुक करेल, याचीही सुतराम शक्यता नाही. पण याला छेद देणारी घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये घडली. चक्क नगर शहर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांचा जाहीर सत्कार केला. व तोही भुतारे यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या वाढीव बिलांविरोधात आवाज उठवल्याबद्दल. पण यानिमित्ताने भुतारेंच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे कौतुकास्पद असले तरी कोरोना काळात रुग्णांना दिलासा देण्यात भाजप कमी पडला व भुतारेंनी केलेले काम भाजपच्या कोणालाही करता आले नाही, हेही यातून स्पष्ट होत आहे. 

जागतिक योगदिनाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी बुरुडगावच्या नक्षत्र लॉनमध्ये शहर भाजपच्या पुढाकाराने योगासने प्रात्यक्षिके झाली. या कार्यक्रमास मनसेचे भुतारे हे योगप्रेमी म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, महिला आघाडी प्रमुख अंजली देवकर-वल्लाकट्टी आदी उपस्थित होते. या बाबत सोशल मिडियातून भुतारे यांनी पोस्ट शेअर केली असून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोरोना रुग्णांचे खासगी हॉस्पिटलमधील वाढीव बिलांबाबत मदत केल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव व तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.

कृतज्ञता व अपयश

एख़ाद्याने चांगले काम केले तर त्याचे कौतुक करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही भारतीय संस्कृती आहे. यादृष्टीने विचार केला तर भाजपने मनसेच्या पदाधिकार्‍याने कोरोना काळात रुग्णांना दिलेला दिलासा महत्त्वाचा मानून त्याबद्दल त्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे. पण दुसरीकडे राज्यात व देशात प्रथितयश राजकीय पक्ष असताना व कोरोना काळात रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूटमार सुरू असताना भाजपने पक्ष म्हणून त्याविरोधात आवाज उठवला नाही व रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासाही दिला नाही. ते भाजपचे सर्वाधिक मोठे अपयश ठरल्याचेही या सत्कारातून स्पष्ट झाले आहे. मात्र, यानिमित्ताने नगरमधील एक राजकीय पक्ष दुसर्‍या राजकीय पक्षाच्या चांगल्या कामाचे जाहीर कौतुक करतो, हाही आगळावेगळा मुद्दा नगरकरांना दिलासा देणारा ठरला आहे.

COMMENTS