Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना नफ्याला चालना देण्यासाठी मिळणार मदत

नाशिक– शेतकऱ्यांना मुख्य हंगामात मजुरांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि अतिवृष्टीमुळे हाताने तण काढणे किंवा शेती यंत्राचा वापर करणे

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 
कार्यक्षेत्रातील ऊस सोडून इतरत्र टोळ्यांची हलवा-हलवी थांबवा; अन्यथा आंदोलन; कारखानदारांना स्वाभिमानाचा इशारा
डॉ. तेजस शेंडे यांना पीएचडी पदवी प्रदान

नाशिक– शेतकऱ्यांना मुख्य हंगामात मजुरांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि अतिवृष्टीमुळे हाताने तण काढणे किंवा शेती यंत्राचा वापर करणे कठीण झाले असताना या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी हे नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यात आले आहेत.शाश्वत कापूस उत्पादनासाठी पाइना मध्ये कापूस तण व्यवस्थापन उत्पादने हिटवीड, हिटवीड मॅक्स, मॅक्सकॉट यांचा समावेश आहे.गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या जीएव्हीएल,पीक संरक्षण व्यवसायाची पाइना ब्रँड उत्पादने कापूस शेतकर्यां ना त्यांचा प्रति एकर लागवड खर्च कमी करण्यास मदत करू शकतात असे आज कंपनीतर्फे सांगण्यात आले. याबद्दल बोलतांना राजावेलू एनके म्हणाले,आम्ही शाश्वत कापूस उत्पादन पद्धतींना चालना देत शेतीची उत्पादकता आणि नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. कापूस शेतकर्यां च्या खर्चात लक्षणीय बचत दाखवून देत आमच्या पाइना  ब्रँड उत्पादनांसह आम्ही त्यांच्या आर्थिक यशात सतत योगदान देत आहोत. भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे अंतिम ध्येय असल्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि पाइना उत्पादन पोर्टफोलिओच्या छत्राखाली मिश्रण आणि फॉर्म्युलेशनमध्ये नाविन्यता आणत आहोत.”

COMMENTS