पुढील सात दिवस फारसा पाऊस नाही; पुणे वेधशाळेचा अंदाज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुढील सात दिवस फारसा पाऊस नाही; पुणे वेधशाळेचा अंदाज

अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असल्याने पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

नाशिकमध्ये फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात
पिंपरी महापालिकेत सनदी अधिकार्‍याच्या नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळला
अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

पुणे : अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असल्याने पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. जूनच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सून दणक्यात सुरु झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आणि गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर, मुंबईची चांगलीच दाणादाण उडवून दिली. मात्र, आता गेले दोन दिवस पाऊस गायब झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तर, याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

COMMENTS