Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. वयाच्या 88

खर्ड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
संसदेवरील चढाई आणि…. 
एचएएलच्या नावाने लोकांना भडकवण्यात आले ः पंतप्रधान मोदी

मुंबई/प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.
जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर बोलताना जयवंत वाडकर म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.  जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. ’अपराध मीच केला’ (गोळे मास्तर), ’अपूर्णांक’, ’अलीबाबा चाळीस चोर’, ’अल्लादीन जादूचा दिवा’, ’आम्ही जगतो बेफाम’, ’एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ’एकच प्याला’ नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे.

COMMENTS