केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील लहुरी येथे जमीनीच्या वादातून सुट्टीवर गावी आलेल्या एका जवानाने आपल्या वडीलां वरच जीवघेणा हल्ला केल्याने वडील गंभ
केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील लहुरी येथे जमीनीच्या वादातून सुट्टीवर गावी आलेल्या एका जवानाने आपल्या वडीलां वरच जीवघेणा हल्ला केल्याने वडील गंभीर जखमी झाले असून याघटनेत वडील बालंबाल बचावले असून त्यांची प्रकृतीच्या स्थिरअसल्याचे समजते.दरम्यान सदरची घटना केज तालुक्यातील लहुरी येथे पडली आहे.
याबाबत वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवान मुलगा व फिर्यादी ची पत्नीच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी अध्याप ही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.याबाबत अधिक माहिती अशी की,केज तालुक्यातील लहुरी येथील फिर्यादी नरहरी दशरथ चाळक यांना दोन पत्नी असून पहिल्या पत्नीचे दोन मुले नामे अशोक व प्रकाश असून फिर्यादी हे त्यांचे सोबत राहत आहेत.परंतु फिर्यादी ची दुसरी पत्नी नामे उर्मिला नरहरी चाळक असून तिच्या पासून एक मुलगा रविकुमार व एक मुलगी क्रांती अशी दोन मुले आहेत.क्रांतीचे लग्न झाल्याने ती सासरी राहत आहे.तर मुलगा रविकुमार फिर्यादीची दूसरी पत्नी उर्मिला हिने जमिनीबाबत केज न्यायालयात 2010 सालामध्ये दावा दाखल केला होता.परंतु तो दावा न्यायालयाने नामंजूर करत फेटाळून लावला आहे. असे असताना दूसरी पत्नी ऊर्मिला व मुलगा रविकुमार यांनी दिनांक 9 जुलै 2023 रोजी वडील नरहरी दशरथ चाळक व त्यांचा पुतन्या पंकज अनिल चाळक यांचे सोबत लहुरी शिवारातील शेत सर्वे नंबर 191 मधील इनाम नावाचे शेतात पत्र्याचे शेडजवळ बसलेले असताना फिर्यादीची पत्नी उर्मिला व मुलगारविकुमार नरहरी चाळक हा सैन्य दलात नौकरीस आहे. दरम्यान हे दोघे आले.व मुलगा रविकुमार याने शिवीगाळ व मारहाण केली.परिणामी गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत आहे. रविकुमार वडील नरहरी दशरथ चाळक यांना म्हणाला की,तुझ्या नावावर असलेले माझ्या नावावरचे शेत कधी देतोस ? असे म्हणाला त्यावर फिर्यादीने नंतर बघू असे म्हणताच मुलगा रविकुमार पत्नी उर्मिला यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून रविकुमार यांने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्यानाकावर व डाव्या हाताच्या मनगटा वर मारून गंभीर दुखापत केली.त्याच वेळी जवळ असलेला फिर्यादीचा पुतण्या पंकज अनिल चाळक याने सोडवासोडव केली असता आरोपींनी त्याला देखील लाथा बुक्यांनी बेदम मारहाण रविकुमार याने केली. फिर्यादीच्या पँन्टच्या खिशात असलेला रेडमी 8 कंपनीचा दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढून घेवून निघून गेला.व जातांना म्हणाला की,शेत माझ्या नावावर केले नाहीस तर तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी देवून तेथून निघून गेले.त्यानंतर फिर्यादीचा पुतण्या पंकज याने त्यांचा मुलगा प्रकाश, भाऊअनिल यांनाबोलावून घेतले.नंतर सर्वजण केज येथील पोलीस ठाण्यात आले.मात्र फिर्यादीस जबर मार लागल्यामुळे पोलिसांनी उपचारासाठी लेखी पत्र देवून सरकारी दवाखान्यात पाठविले त्यामुळे फिर्यादी हे केज येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी गेले असता तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालयात रेफर केले.दरम्यान फिर्यादीला जबर मार लागल्याने व गंभीर जखमी असल्यामुळे अंबाजोगाई येथील डॉक्टरांनी अडमीट केले. त्यानंतर उपचारानंतर प्रकृती ठिक झाल्यानंतर फिर्यादी नरहरी दशरथ चाळक यांनी केज पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध रितसर फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी जवान रविकुमार नरहारी चाळक,व पत्नी उर्मिला नरहरी चाळक यांचेविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं,418/2023 कलम 327,326,323, 504,506,34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान गुन्हादाखल होऊन आठ दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असून यातील आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही.पुढील तपास केज पोलिस करीत आहेत.
COMMENTS