Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव ते तेलगाव रस्ता ऊखळुन टाकून नविन रस्त्या ला सुरूवात

बीड प्रतिनिधी - माजलगाव हुन तेलगाव हा रस्ता काही वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता परंतु काहीच महिन्यात त्यावर खोल व रुंद भेगा पडल्या होत्या. ह्या

’पासष्टी’ सारखी पुस्तकनिर्मिती माणुसकीची संस्कृती ः लेविन भोसले
बायोडिझेलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणर्‍या तिघांविरुद्ध गुन्हा
सिटी स्कॅन केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी ; कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची रिपोर्टसाठी झुंबड

बीड प्रतिनिधी – माजलगाव हुन तेलगाव हा रस्ता काही वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता परंतु काहीच महिन्यात त्यावर खोल व रुंद भेगा पडल्या होत्या. ह्या भेगांमुळे येणार्‍या जाणार्‍या वाहतुकीला विशेषत दुचाकी धारकांच्या जीवास खूप मोठा धोका निर्माण झाला होता. या रस्त्यावर या भेगांमुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेक नोकरदार या रस्त्यावरून दररोज ये जा करतात. या भेगांमध्ये एका कडीने जाणार्‍या दुचाकी आपोआप रस्त्याच्या मध्ये येतात व मोठ्या वाहनांना धडकत होते. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करून होता. ही समस्या ओळखून मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा जमियते उलेमा-ए-हिंदचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी मागणी केली होती की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा व वाहतुकीसाठी सुरळीत करावा. त्यांच्या या मागणीनंतर संबंधित विभागाने हा रस्ता दुरुस्त करायला सुरुवात केली. म्हणूनच नुमान अली चाऊस यांनी केलेल्या या पाठपुराव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS