Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी

तब्बल ३६ तासांपेक्षा जास्त काळ मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर

इर्शाळवाडी- इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती आहे. आत

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी
देशाचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे ते संपवू शकणार नाही-प्रणिती शिंदे 

इर्शाळवाडी- इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना वाचवण्यात आलं आहे. दरम्यान शोधमोहिम राबवताना बचाव पथकाला मोठं यश मिळालं आहे. एका महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. आंबी बाळू पारधी असं ४० वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला तब्बल ३६ तासांपेक्षा जास्त काळ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली आहे. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

COMMENTS