Homeताज्या बातम्यादेश

मणिपूर घटनेवरून विरोधकांचा गदारोळ

दुसर्‍या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसदेचे पावसाळी अधिवेशन गुुरुवारपासून सुरूवात झाली. गुरूवारीच मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आ

लातूर जिल्ह्यात मोतिबिंदुच्या 23506 शस्त्रक्रिया
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती उदारपणा दाखवावा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसदेचे पावसाळी अधिवेशन गुुरुवारपासून सुरूवात झाली. गुरूवारीच मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी संसदेत गदारोळ घातला. शुक्रवारी देखील सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत मणिपूरवर चर्चा करण्याबाबत बोलले. मात्र विरोधकांनी त्यांचे म्हणणे न ऐकता गोंधळ सुरूच ठेवला. मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी काँग्रेसने स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे.
लोकसभेतील काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि मणिकम टागोर आणि राज्यसभेतील आपचे खासदार संजय सिंह आणि आरजेडी नेते मनोज कुमार झा यांच्यासह अनेक खासदारांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करणार्‍या नोटिसा दिल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी मणिपूरच्या घटनेवरून गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुसर्‍या दिवशीसाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदी म्हणाले होते-आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. खरगे यांनी ट्विटरवर लिहिले की, नरेंद्र मोदी जी, तुम्ही काल संसदेत वक्तव्य केले नाही. तुम्हाला राग आला असता, तर काँग्रेस शासित राज्यांशी खोटी तुलना करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना आधी हटवू शकले असते, असे म्हणत हल्लाबोल केला.  पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 17 बैठका होणार आहेत. केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात 31 विधेयके आणत आहे. त्यापैकी 21 नवीन विधेयके आहेत, तर 10 विधेयके यापूर्वीच संसदेत मांडण्यात आली आहेत. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. दिल्लीतील अधिकार्‍यांच्या बदल्या-पोस्टिंगशी संबंधित अध्यादेश हे सर्वाधिक चर्चेत असलेले विधेयक आहे.

COMMENTS