Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील धरणांमध्ये 42 टक्के पाणीसाठा

मुंबई : गेले काही दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणक्षेत्रात 42.75 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षी

नेवासा , राहुरी व पाथर्डी तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
नगर- दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे नगर तालुका पोलिसांचा वेश्या व्यवसायावर छापा
एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या

मुंबई : गेले काही दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणक्षेत्रात 42.75 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये 88 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सहा धरणे भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईत आणि महानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असला तरी तुलनेत धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. दररोज थोडोथोडा पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात केवळ निम्मा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतील पाणीसाठ्यात दररोज वाढ होते आहे. पावसाबरोबरच जमिनीतून झिरपणार्‍या पाण्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. मात्र अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईकरांना दररोज 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सध्या धरणांमध्ये 6 लाख 18 हजार 754 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.

COMMENTS