Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथील वेळूवन बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न.

केज प्रतिनिधी - केज शहरातील वेळूवन बुद्ध विहार भीमनगर येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा केज यांचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शि

साताऱ्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार 
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोवले
‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात

केज प्रतिनिधी – केज शहरातील वेळूवन बुद्ध विहार भीमनगर येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा केज यांचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बीड जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष एस.बी.शिंदे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे केज तालुका अध्यक्ष नंदकुमार मस्के, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नांदेडचे जेष्ठ केंद्रीय शिक्षक युवराज मोरे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहर शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर ठोके,बीड पूर्व पर्यटन व प्रसारचेउपाध्यक्ष एस.एस.सोनवणे,बीडपूर्वचे संघटक भारत सातपुते, अरुण पटेकर,कार्यालयीन सचिव पंकज भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दीपांनी पूजा करून सामुदायिक बुद्ध वंदना घेतली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा यांचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे दोन सत्रा मध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके यांनी केले उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण म्हणजे काय ? या विषयावर मार्गदर्शन केले. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक युवराज मोरे यांनी भारतीय बौद्ध महासभा आणी त्यांचे कार्य तर दुपारच्या दुसर्‍या सत्रात कार्यालयीन कामकाज व लेखा पद्धती या विषयावर प्रशिक्षणांर्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.विभागीय सचिव व्हि.एन.निसर्गंध यांनी सकाळच्या पहिल्या सत्रात कार्यकर्ता आणी त्यांची आचारसंहिता तर दुपारच्या दुसर्‍यासत्रामध्ये पदाधिकारी आणी त्यांची जिम्मेदारी काय ? या विषयाचे महत्त्व सांगून त्याचीमाहितीप्रशिक्षणार्थी यांना सांगितली आहे. यावेळी उपस्थित मान्य वरांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशिक्षणार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.अध्यक्षीय समारोप करताना नंदकुमार मस्के यांनी कार्यकर्ता म्हणजे काय व त्याचे कार्य काय आणी प्रशिक्षण शिबिर घेण्या मागचा उद्देश काय ? याचे महत्व उपस्थित प्रशिक्षणांर्थी यांना सांगितले आहे. यावेळी बाबा पोटभरे,गोरक्षनाथ तूपसागर,हनुमंत शिंदे, बालासाहेब जोगदंड, सुमित कुमार मस्के, चंद्रकांत मस्के,नितीन धीवार,बळीराम सोनवणे, आश्रुबा खरात,मीराताई खरात,लताताई वाघमारे, सुनिताताई कांबळे, श्रीमती जनाबाई मस्के, भैय्यासाहेब आरकडे, दयानंद सातपुते,जे.व्ही. मिसळे,हिरकणीताई गायकवाड,कुसुमताई मस्के,गौरीताई सरवदे, साधनाताई बचूटे, विद्याताई कांबळे,भारत ढालमारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखेचे पदाधिकारी आणी समाज बांधव मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार मस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयपाल मस्के यांनी मानले.

COMMENTS