बीड प्रतिनिधी - उसतोड कामगार कृती समिती बीड आयोजित चलो शिक्षा की ओर (जागर शैक्षणिक योजनांचा कार्यक्रम के.प्रा.जि.प.शाळा हिवरसिंगा येथे संपन्न झा
बीड प्रतिनिधी – उसतोड कामगार कृती समिती बीड आयोजित चलो शिक्षा की ओर (जागर शैक्षणिक योजनांचा कार्यक्रम के.प्रा.जि.प.शाळा हिवरसिंगा येथे संपन्न झाला.या प्रसंगी दत्ताजी नलावडे (संस्कृती विद्यालय)श्री.शेख सर (मुख्याध्यापक मानुरकर माध्यमिक विद्यालय) श्री.अशोक मिसाळ (ग्रामविकास अधिकारी) श्री.शिवराम राऊत (अध्यक्ष धनश्री शेतकरी मंडळ) समीर पठाण (सदस्य बालहक्क समिती) श्री.बाजिराव ढाकणे (समुदाय संघटक – श्री.गौतम औसरमल (पत्रकार) मानुरकर माध्यमिक विद्यालय व जि.प.विद्यालयाचे शिक्षकवृंद विद्यार्थी, ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मौ हिवरसिंगा या ग्रुप ग्रामपंचायत चे कर्तव्य तत्पर ग्रामविकास अधिकारी श्री.अशोकराव मिसाळ यांचा ग्रामस्थ व ऊसतोड कामगार कृती समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने श्री.दत्ता नलावडे, श्री.शिवराम राऊत,समीर पठाण,बाजीराव ढाकणे, व श्री.व्ही.के.मिसाळसर यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.श्री.मिसाळ यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य गावक-यांना विविध घटक योजना, सामाजिक योजना, रोजगार हमी योजना तसेच शेतकरी हितासाठी अनेक लाभाच्या योजनेत मोलाचे सहकार्य केले.हिवरसिंगा गावातील विविध सामाजिक उपक्रम ,लोक उपयुक्त कार्यक्रम हि राबविण्यात अग्रेसर भूमिका असणारे ग्रामविकास अधिकारी आहेत.हिवरसिंगा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ऊसतोड कामगारांच्या नोंदणी सर्व सुविधा मोफत मिळतील, त्यांच्यासाठी असणारी प्रत्येक योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.या अशा अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.मौ.हिवरसिंगा गावचे आदर्श व कर्तव्ये दक्ष ग्रामविकास अधिकारी असे विचार श्री.शिवराम राऊत यांनी व्यक्त केले.यावेळी मानुरकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षकवृंद,प्रा.शाळेतील शिक्षकवृंद विद्यार्थी, ऊसतोड कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS