नवी दिल्ली ः महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस

नवी दिल्ली ः महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला जामीन देताना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय परदेश दौर्यावर जाता येणार नाही, अशी अट घातली आहे. ब्रिजभूषणच्या जामीनाबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही जामीन अर्जाला विरोध किंवा समर्थन करत नाही. याआधी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सकाळीच सुनावणी घेऊन जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता
COMMENTS