‘सगळ्या चोरांचे आडनाव, मोदी का’? प्रकरणी राहुल गांधींची सूरत कोर्टात हजेरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सगळ्या चोरांचे आडनाव, मोदी का’? प्रकरणी राहुल गांधींची सूरत कोर्टात हजेरी

गुन्हेगारी स्वरुपाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सूरत न्यायालयात हजेरी लावली. यावेळी न्यायालयात राहुल यांचा जबाब नोंदवण्यात आला.

पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या
ज्‍येष्ठ नागरिक सारथी सन्‍मान सोहळा २०२३ चे १२ ऑगस्‍टला आयोजन 
मै भी राहुल म्हणत युवक काँग्रेसचे माहूरात जेलभरो आंदोलन !

सूरत : गुन्हेगारी स्वरुपाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सूरत न्यायालयात हजेरी लावली. यावेळी न्यायालयात राहुल यांचा जबाब नोंदवण्यात आला. राहुल यांनी, ‘सगळ्या चोरांचे आडनाव, मोदी का’ असे वक्तव्य केले होते. याविरोधात गुजरातच्या एका आमदाराने राहुल गांधींविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. 

सूरतचे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी भादंविचे कलम 499 आणि 500 अंतर्गत एप्रिल 2019 मध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात एका आठवड्यापूर्वी सूरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एन. दवे यांनी राहुल गांधी यांना 24 जून रोजी अंतिम जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. राहुल यांनी 2019 च्या एका निवडणूक प्रचार सभेत ‘सगळ्या चोरांचं एकच आडनाव मोदी कसs’ असा प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसकडून कर्नाटकच्या कोलारमध्ये 13 एप्रिल 2019 रोजी ही निवडणूक रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… या सर्वांचे एकच आडनाव मोदी कसे? सर्व चोरांचं एकच आडनाव मोदी कसं आहे?’ असे जाहीर वक्तव्य करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यापूर्वी राहुल गांधी याच प्रकरणात ऑक्टोबर 2019 मध्ये न्यायालयासमोर हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी स्वत:ला दोषी मानण्यास त्यांनी नकार दिला होता.

COMMENTS